पुण्यात माजी महापौरांची फसवणूक करणाऱ्या फरार आरोपीस अटक

429

पुणे, दि. ११ (पीसीबी) – जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करुन त्याद्वारे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांच्यासह अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या फरार आरोपीला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे़.

आशिष काळुराम गोयरे (वय ४१, रा़. शंकर महाराज मठाजवळ, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे़.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष याने जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करुन माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांच्यासह अनेकांना लाखोंचा गंडा घातला होता. तो अनेक वर्षे फरार होता़. आशिष याच्यावर समर्थ, शिवाजीनगर, अलंकार, डेक्कन अशा अनेक पोलीस ठाण्यात यापूर्वी फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत़. डेक्कन पोलिसांनी त्याला अशाच एका प्रकरणात २००७ मध्ये अटक केली होती़.