पुण्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा

139

पुणे, दि. २९ (पीसीबी) – मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यातील डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून आज (रविवार) मोर्चा काढण्यात आला. तऱ शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयासमोर मागण्यांचे निवेदन ठेवून समारोप करण्यात आला.  या मोर्चा दरम्यान सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.  

डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून  सकाळी साडे अकरा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर पुढे बालगंधर्व रंगमंदिर चौक, पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या बाजूने पुढे शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या येथे समारोप करण्यात आला . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयासमोर मागण्यांचे निवेदन ठेवण्यात आले.