पुण्यात मराठा आंदोलना दरम्यान तोडफोड करणाऱ्या १८५ जणांना अटक

87

पुणे, दि. १० (पीसीबी) – मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान पुण्यात हिंसक वळण घेतले. यावेळी काही संतप्त आंदोलकांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर दगड फेक करुन प्रवेश व्दार तोडले, पोलिसांवर काचाच्या बाटल्या, बुट आणि चप्प फेकल्या, काही माध्य प्रतिनिधींना वृत्तांकन करण्यापासून रोखले होते. तर चांदणी चौकात आंदोलकांनी पोलिसांवर दगड फेक केली होती. ज्यामध्ये पाच पोलिस जखमी झाले होते.