पुण्यात भाजप कार्यालयात गुरूवारी अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थी कलश दर्शनासाठी ठेवणार

74

पुणे, दि. २२ (पीसीबी) – दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा  अस्थी  कलश गुरुवारी  ( दि.२३ ) सकाळी साडेदहा ते दुपारी ३ या वेळेत जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सन्मान, भाजप मध्यवर्ती कार्यालय येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट सकाळी मुंबईहून पुण्याला अस्थी कलश आणणार आहेत,  अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिली.