पुण्यात बाप विचित्र वागतो म्हणून मुलानेच केला बापाचा खून

1158

पुणे, दि. १९ (पीसीबी) – बाप दारु पिऊ विचित्र वागत असल्याच्या कारणावरुन मुलानेच दोन अल्पवयीन मित्रांच्या सहाय्याने बापाचा गळा लाटण्याने आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवार (दि.१२) दुपारी दीडच्या सुमारास हडपसर येथील शिंदेवस्तीतील कवडे मळा येथे घडली होती.

बापु अशोक शेंडगे (वय ४०, रा. तुकाईनगर, वंडगांव-बुद्रुक, पुणे) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा गणपत उर्फ सोन्या बापु शेंडगे (वय १९, रा. शिंदेवस्ती, कवडे मळा, हडपसर) याच्यासह त्याच्या दोन मित्रांना सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार दुपारी दीडच्या सुमारास बापु शेंडगे हे दारु पिऊन विचित्र वागतात म्हणून त्यांचा मुलागा गणपतने दोन अल्पवयीन मित्रांच्या सहाय्याने बापु यांचा हडपसर येथील शिंदेवस्तीतील कवडे मळा येथे गळा लाटण्याने आवळून खून केला. तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह काथ्याने बांधून कॅनलमध्ये फेकून दिला. खून केल्यानंतर तो श्रीरामपुर येथे पळून गेला. यावेळी श्रीरामपुर पोलिसांना तो संशयितरित्या आढळ्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे वडिल बापु शेंडगे यांचा खून केल्याचे कबुल केले. त्याला सिंहगड पोलिसांकडे सोपवण्यात आले असून सिंहगड पोलिस त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांच्या देखील मुसक्या आवळ्या आहेत. सिंहगड पोलिस तपास करत आहेत.