पुण्यात बापाला संपवण्यासाठी मुलाने केल्या तीन घरफोड्या

940

पुणे, दि. १४ (पीसीबी) – वडिल आईला प्रॉपर्टीमध्ये हिंसा देत नाही म्हणून पिस्तूल खरेदी करुन वडिलांचा खून करण्यासाठी एका तरुणाने तब्बल तीन घरफोड्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिलिंद रमेश जुनवणे (वय २३, रा. उत्तमनगर, पुणे) व बाळासाहेब रामच्रंद्र जाधव (वय ४२, रा. शिवणे, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरात घरफोड्या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी मिलिंद जुनवणे याचे वडिल रमेश जुनवणे यांनी दुसरे लग्न केले आहे. तसेच त्याने मिलिंद याच्या आईला प्रॉपर्टीमध्ये हिंस्सा दिला नव्हता. यामुळे संतापलेल्या मिलिंदने मित्र बाळासाहेबसोबत मिळून कोंढव्यात ३ घरफोड्या केल्या. तसेच घरफोड्या करुन जमलेल्या पैशात पिस्तूल खरेदी करुन वडिलांचा खून करण्याचे ठरवले होते, अशी कबुली मिलिंद ने पोलिस चौकशी दरम्यान कोंढवा पोलिसांना दिली. आरोपी मिलिंदचे वडिल रमेश जुनवणे हे देखील सराईत गुन्हेगार आहेत. कोंढवा पोलिस तपास करत आहेत.