पुण्यात ‘फिल्मी स्टाइल’ने गाड्या चोरणाऱ्याला अटक

398

पुणे, दि. १५ (पीसीबी) – कोण यू- ट्यूबवरील व्हिडिओचा कसा उपयोग याचा काही नेमच राहिला नाही. पुण्यात असे व्हिडिओ पाहून एक चोर गाड्या चोरू लागलगाड्या चोरी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या सराईत चोराला भारती विद्यापीठ पोलिसांनी अखेर अटक केली आहे.

मोतीलाल कोतवाल (वय २०) असे अटक करण्यात आलेल्या चोराचे नाव असून त्याने मेकॅनिकलचे शिक्षण घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस वाहन चोरीच्या व घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी तपास पथकाचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना पोलिसाना माहिती मिळाली की, एक व्यक्ती गुजरवाडी फाटा येथे थांबलेली असून त्याने आठवड्यापूर्वी रात्रीच्या वेळी होंडा शाइन बाइक चोरली होती. माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. गुजरवाडी फाट्याजवळ संशयीतरित्या वावरत असलेल्या व्यक्तीला त्यांनी हटकले असता, तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु, पोलिसांना त्याला पकडण्यात यश आले.

पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्या चोरावर भारती विद्यापीठ पोलीस ठाणे तसेच शिक्रापूर, लोणी काळभोर अशा अनेक ठिकाणी गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. त्याच्याकडून तीन दुचाकी, दोन लॅपटॉप असा लाखोंचा ऐवज जप्त करण्यात आला. भारती पोलिस तपास करत आहेत.