पुण्यात पोलिस हवालदाराची गळफास घेऊन आत्महत्या

1031

पुणे, दि. ९ (पीसीबी) – स्वारगेट पोलीस लाईन बिल्डिंग क्र.६ मध्ये एका पोलिस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजणक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी (दि.८) रात्री अकराच्या सुमारास उघडकीस आली.

उमेश राऊत (वय ४५) असे मृत पोलीस हवालदाराचे नाव आहे. ते डक्कन पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उमेश राऊत हे नेहमी प्रमाणे डेक्कन पोलीस ठाण्यातील काम आटपून स्वारगेट येथील त्यांच्या घरी गेले होते. यादरम्यान त्यांचा पत्नीसोबत किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. यानंतर उमेश यांनी बाथरुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ बाथरुममधून बाहेर न आल्याने त्यांच्या पत्नीने हाक मारली. तरीही प्रतिसाद न दिल्याने शेवटी दरवाजा उघडल्यावर त्यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले़. घटनेची माहिती मिळताच खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. राऊत यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.