पुण्यात पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळला; जुन्या संगम पुलाजवळील घटनेत दोन जण ठार

155

पुणे, दि. २१ (पीसीबी) – शिवाजीनगर येथील कामगार पुतळ्यासमोर असलेल्या जुना संगम पुलाचा कठडा तोडून ट्रक मुठा नदीपात्रात कोसळला. शनिवारी (दि. २१) पहाटे घडलेल्या या घटनेत दोन जण जागीच ठार झाल्याची शक्यता आहे.

शिवाजीनगरमधील कामगार पुतळा ते जुन्या बाजारदरम्यान शेजारीच नदीवर पूल आहे. शनिवारी पहाटे एक ट्रक (एमएच ४२ टी ७३१२) शिवाजीनगर येथून पुणे स्टेशनकडे निघाला होता. कामगार पुतळा ते जुना बाजारदम्यानच्या मार्गावरून भरधाव वेगाने जुन्या बाजारकडे जाताना ट्रकचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि रेल्वे पूल व जुना संगम पूल यांच्या मधल्या भागातील पुलाचा कठडा तोडून ट्रक मुठा नदीपात्रात कोसळला. ट्रक नदीपात्रात उटला पडला आहे. या घटनेत दोघेजण जागीच ठार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, क्रेनच्या सहाय्याने ट्रक नदीपात्रातून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.