पुण्यात दीर वेळोवेळी शरीरसुखाची मागणी करीत असल्याने विवाहितेची आत्महत्या

0
5885

पुणे, दि. २८ (पीसीबी) – विवाहापुर्वीच्या प्रमेप्रकरणाची माहिती झाल्याने त्याचा गैरफायदा घेऊन बदनामी करण्याची धमकी देऊन दीर आपल्या वहिनीकडे शरीर सुखाची मागणी करीत होता. या धमकीला व त्याच्या मागणीला घाबरून २४ वर्षाच्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दीर सुहास हनुमंत शिळीमकर (रा. वीरवाडी, ता. भोर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी विवाहितेच्या आईने पोलिसांकाडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गितांजली आणि सागर यांचा डिसेंबर २०१३ मध्ये विवाह झाला. लग्नानंतर दोनच महिन्याने तिचा दीर सुहास याला गितांजली हिचे लग्नापुर्वी चाकण येथील एका तरूणाबरोबर प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. गितांजली आपल्या पतीबरोबर आंबेगाव खुर्द येथे राहत होती. तर तिचा दीर सुहास भोर तालुक्यातील वीरवाडी येथे राहायला आहे.

तो अनेकदा जाणीवपुर्वक पुण्यात येऊन गितांजलीला तुझ्या लग्नापुर्वीच्या प्रेमसंबंधाची माहिती घरातील सर्वांना सांगेन, अशी धमकी देत होता. कोणाला सांगू नये, यासाठी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करीत असे. तिने त्याला वारंवार टाळले. ही मागणी मान्य न केल्याने तो तिचा मानसिक छळ करू लागला. त्याच्या धमक्यांना कंटाळून गितांजली हिने २४ सप्टेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिस तपास करत आहेत.