पुण्यात डीएसके ठेवीदाराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

150

पुणे, दि.१७ (पीसीबी) – पुण्यात डीएसके ठेवीदाराने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

तानाजी गणपत कोरके (वय ६०) असे या आत्महत्या केलेल्या व्यक्तिचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या लग्नासाठी डीएसकेकडे गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्याने त्यांनी आत्महत्येच पाऊल उचलले. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी आपल्या आत्महत्येसाठी डीएस कुलकर्णी यांना जबाबदार ठरवले आहे. चौथ्या मुलीचे लग्न करायचे असून त्यासाठी पैसे मिळत नसल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.