पुण्यात ट्रकने दुचाकींना दिलेल्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू, दोघे जण गंभीर जखमी

199

पुणे, दि.११ (बीपीसी) – पुण्यातील लवळे फाटा येथील पिरंगुट घाट उतारावर ट्रकने दुचाकीना जोरदार धडक दिली. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. नागेश अंकुश गव्हाणे वय २१, पूजा बंडू पाटील वय १७,वैष्णवी सुनील सोनवणे वय २० या तिघांचा मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, पिरंगुट घाट उतारावर आज रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरून काही दुचाकी जात होत्या. तेवढ्यात मागून येणार्‍या एम एच १५ जी व्ही ९०११ या ट्रकने जोरदार धडक दिली. या घटनेत नागेश अंकुश गव्हाणे वय २१, पूजा बंडू पाटील वय १७,वैष्णवी सुनील सोनवणे वय २० या तिघांचा मृत्यू झाला. तर दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांची नावे समजू शकली नाही. दोन दुचाकीना धडक देऊन पळून जाणाऱ्या ट्रक चालकास घोटावडे फाटा येथे वाहतूक पोलिस मयूर निंबाळकर आणि इतर नागरिकांनी पकडण्यात यश आले आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तिघांचा मृतदेह पौड येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर जखमींना पिरंगुट येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच धडक देणार्‍या आरोपी ट्रक चालकास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडे चौकशी करण्यात आहे. तर यातील मयत वैष्णवी सोनवणे ही एका कंपनीत कामाला होती आणि पूजा पाटील इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती. अशी प्राथमिक माहिती समोर येत असल्याचे सांगण्यात आले.