पुण्यात झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला जबर मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

211

पुणे, दि. १७ (पीसीबी) – ऑर्डर केलेल जेवण घेऊन लोकेशनवर पोहचलेल्या झोमॅटो या फूड डिलिव्हरी अॅपच्या एका डिलेवरी बॉयला पाच जणांच्या टोळक्यांनी लाथाबुक्क्या आणि काठीने जबर मारहाण करत जखमी केले. ही घटना नळस्टॉप परिसरात घडली असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

प्रविण कदम असे मारहाण झालेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, पाच जणांच्या टोळक्यांनी झोमॅटो या फूड डिलिव्हरी अॅपवरून जेवण मागवले होते.  ऑर्डर केलेल जेवण घेऊन डिलेवरी बॉय प्रविण लोकेशनवर पोहचला. यादरम्यान डिलेवरी बॉय आणि आरोपींमध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपींनी प्रविणला लाकडी दांडक्याने जबर मारहाण करत जखमी केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी सध्या फरार आहेत. तसेच याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला नाही.