पुण्यात झालेल्या तोडफोडप्रकरणी १८५ जण ताब्यात

1384

पुणे, दि. १० (पीसीबी) – मराठा मोर्चाने पुकारलेल्या बंददरम्यान पुण्यात झालेल्या तोडफोडप्रकरणी, पोलिसांनी १८५ जणांना ताब्यात घेतले आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या आंदोलनाला काल हिंसक वळण लागले. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड केली. माध्यमांच्या प्रतिनिधींनाही यावेळी वार्तांकन करण्यापासून रोखण्यात आले. चांदणी चौकात पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. जमलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीसांना लाठीमार तसेच अश्रूधुराचाही वापर करावा लागला. या दगडफेकीत काही पोलिसही जखमी झाले.

पोलिसांनी चांदणी चौक दगडफेक प्रकरणी ८३, जिल्हाधिकारी कार्यालय राड्याप्रकरणी ५ महिलांसह ७६, डेक्कन येथे रास्तारोको करणार २१ असे एकूण १८५ जणांना ताब्यात घेतले.