पुण्यात जुन्या भांडणाच्या रागातून मित्रावरच गोळीबार

118

पुणे, दि. १४ (पीसीबी) – जुन्या भांडणाचा राग मनात धरुन एकाने आपल्या मित्रावरच छऱ्याच्या बंदुकीतुन गोळीबार करुन जखमी केले. ही घटना बुधवारी (दि.१३) रात्री अकराच्या सुमार वडगाव धायरी परिसरात घडली.

रोनित देविदास राठोड (वय २५, रा. दळवीनगर, नांदेडफाटा) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भरत वाघ (वय २७, रा. दळवीनगर, नांदेड फाटा) याला सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोनित आणि भरत हे दोघेही एकमेकांचे मित्र आहेत. त्यांच्यात दोन वर्षापूर्वी भांडण झाले होते. त्याचा राग भरतच्या मनात होता. बुधवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास भरत त्याच्या एका साथीदारासमवेत रोनितकडे गेला. त्यावेळी त्याने पुन्हा एकदा जुन्या भांडणाचे कारण काढत रोनितवर छऱ्याच्या बंदुकीतून गोळी झाडली. गोळी रोनितच्या पोटात गेल्याने त्याच्या पत्नीने त्यास त्वरित रुग्णालयात हलविले. भरत याला पोलिसांनी अटक केली आहे. सिंहगड पोलीस तपास करत आहेत.