पुण्यात करोनाचा पहिला बळी ५२ वर्षीय व्यक्तीचा उपचार दरम्यान मृत्यू

114

 

पुणे, दि.३० (पीसीबी) – पुण्यात करोनाचा पहिला बळी गेला असून ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या व्यक्तीच्या मृत्यूमुळे राज्यातील मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे. यासोबत देशात आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात एकूण ३१ लोक करोनाने बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापैकी सात जणांवर यशस्वी उपचार करुन घरी पाठवण्यात आले आहे. मात्र आज या ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यांना २१ तारखेला दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तपासणी केले असता करोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांना उच्च रक्तदाब, फुफ्फुसाचा त्रास होता. त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज सकाळी त्यांचे उपचारादरम्या निधन झाले.

WhatsAppShare