पुण्यात आलिशान कार घेतल्यानंतर वाटले सोन्याचे पेढे

0
4847

पुणे, दि. ६ (पीसीबी) – ‘हौसेले मोल नसते’, अशी एक म्हण प्रचलित आहे. या म्हणीचा    प्रत्यय पुण्यातील धायरी परिसरातील (सिंहगड रस्ता) अनेक नागरिकांना आला. येथील एका व्यक्तीने गाडी घेतल्याच्या आनंदात चक्क सोन्याचे पेढे नागरिकांना वाटले.  

धायरी परिसरात राहणारे बागायतदार सुरेश पोकळे यांनी जग्वार एक्स एफ ही ६० लाखाची आलिशान कार विकत घेतली. कार विकत घेतल्याचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी   आपल्या मित्रांना चक्क सोन्याचे पेढे वाटण्याचा निर्णय घेतला. या सुवर्ण पेढ्यांची ऑर्डर काका हलवाई मिठाईवाले यांच्याकडे दिली.

काका हलवाई यांनी विशेष सोन्याचे वर्ख असलेले पेढे बनवून दिले. ७ हजार रुपये किलो दराने काका हलवाईने पोकळे यांना हे खास पेढे बनवून दिले. पोकळे यांना महागडी गाडी खरेदी केल्याचा आनंद शाही पद्धतीने साजरा करायचा होता. त्यामुळेच त्यांनी लोकांना सोन्याचा वर्ख असलेले पेढे खाऊ घालण्याचा निर्णय घेतला.