पुण्यात आणखी ३ रुग्ण कोरोनाबाधित पुणे शहरातील एकूण रुग्णांचा आकडा १९ वर पोहोचला

177

 

 

पुणे, दि.२४ (पीसीबी) – पुण्यात आणखी ३ रुग्ण सापडल्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा १०१ वर गेला आहे. कोरोनाचा आकडा मर्यादित ठेवण्यासाठी संचारबंदीचे पालन करण्याची आवश्यकता आहे.

पुण्यातील तीन जणांचे कोरोना रिपोर्ट आज सकाळी पॉझिटिव्ह आले. दोन रुग्ण खाजगी हॉस्पिटलमध्ये आहेत, तर एक रुग्ण नायडू रुग्णालयात उपचार घेत आहे. पुणे शहरातील एकूण रुग्णांचा आकडा १९ वर पोहोचला आहे.

गेल्या बारा तासात महाराष्ट्रात कोरोनाच्या चार रुग्णांची भर पडली आहे. साताऱ्यात काल रात्री एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.

WhatsAppShare