पुण्यात अनैतिक संबंधातून पत्नीने केला पतीचा खून

0
3940

पुणे, दि. ६ (पीसीबी) – पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरुन पती वारंवार दारु पिऊन पत्नीसोबत भांडायचा यामुळे पत्नीने पतीचा खून करुन त्याचे प्रेत घराच्या अंगनातच जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.४) वडगाव शिंदे तालुका हवेली येथे घडली.

निलेश भिमाजी कांबळे (वय ३९) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पत्नी विद्या कांबळे हिला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पत्नी विद्या हिचे बाहेर अनैतिक संबंध होते. यामुळे पेंटींगचे काम करणारा पती निलेश हा वारंवार दारु पिऊन तिला मारत होता. मंगळवारी (दि. ४ डिसेंबर) निलेश कामावरून घरी आला, त्यावेळी पत्नी विद्या आणि त्याच्यांत मोठा वाद झाला. विद्याने निलेश याला जीवे मारून मृतदेह अंगणात जाळून शौचालयाच्या टाकीत राख टाकून पुरावा नष्ट केला. या प्रकरणी विद्या विरोधात लोणीकंद पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक  पोलिस निरीक्षक विकास बडवे अधिक तपास करत आहेत.  दरम्यान, विद्याने तीच्या मुलाने ढकलल्याने निलेशचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना भासवले होते. मात्र कसून चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.