पुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवणार

244

पुणे, दि. १८ (पीसीबी) – केरळमध्ये सध्या भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली असून    या पुरात ३२४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे २ लाख नागरिक बेघर झाले आहेत. गेल्या १०० वर्षांतील सर्वात भीषण महापुराचा सामना करणाऱ्या केरळला देशभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. महाराष्ट्रामधूनही केरळला मदत केली जात आहे.पुण्यातून केरळसाठी ७ लाख लिटर पिण्याचे पाणी रेल्वेने पाठवले जाणार आहे.

पूरग्रस्त परिस्थितीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पिण्याचे पाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुण्यातून रेल्वेद्वारे पाणी पोहोचविले जाणार आहे. तसेच गुजरातमधील रतलाम येथून १४ लाख ५० हजार लिटर पाण्याचे वॅगन पुण्यात येणार आहेत.

असे एकूण २१ लाख ५० हजार लिटर पिण्याचे पाणी पुण्यातून केरळला  पाठवले जाणार आहे.  पुण्यातील घोरपडी कोचिंग कॉम्प्लेक्स येथे पाणी भरण्यात येत आहे. रतलामहून पाणी पुण्यात पोहचल्यानंतर आज (शनिवारी ) दुपारी एक नंतर पाण्याच्या गाड्या केरळसाठी रवाना होणार आहेत.