पुण्यातील हॉटेल व्यावसायिकाची विष प्राशन करुन आत्महत्या

761

पुणे, दि. १९ (पीसीबी) – पुण्यातील एका हॉटेल व्यावसायिकाने राहत्या घरी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना आज (मंगळवार) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

अमर कणसे (वय ३५, रा. वारजे माळवाडी) असे आत्महत्या केलेल्या हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. वारजे माळवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा सुरु आहे.

प्राप्त माहितीनुसार, अमर कणसे हे वारजे माळवाडी भागात राहत होते. वारजेतील कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर त्यांचे राजमुद्रा नावाते हॉटेल आहे. आज सकाळी त्यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. दरम्यान त्यांच्या आत्महत्यचे कारण समजू शकलेले नाही. वारजे माळवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.