पुण्यातील शिवसेना विभाग प्रमुखाला आंदोलन केल्याने अटक

122

पुणे, दि. १३ (पीसीबी) – पुण्यीतल टिळक रोड येथील क्षेत्रिय कार्यालयात आंदोलन केल्याने शिवसेनेचे विभाग प्रमुख सुरज नथुराम लोखंडे यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, पुण्यातील शिवसेना विभाग प्रमुख सुरज लोखंडे यांनी कुठल्याही प्रकारची पूर्व कल्पना न देता टिळक रोड येथील क्षेत्रिय कार्यालयात गुरुवारी कचरा टाकून आंदोलन केले होते. यावर क्षेत्रिय कार्यालयाचे आरोग्य अधिकारी आनंद शेंडगे यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत शिवसेनेचे विभाग प्रमुख सुरज लोखंडे यांच्यासह पाच जणांना अटक केली. स्वारगेट पोलिस तपास करत आहेत.