पुण्यातील रॅमी ग्रँड या पंचतारांकित हॉटेलात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; उजबेकिस्थानी महिलेची सुटका

317

पुणे, दि. १४ (पीसीबी) – स्पा सेंटरच्या नावाखाली आपटे रस्त्यावरील रॅमी ग्रँड या पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात सामाजिक सुरक्षा विभागातील अधिकारी आणि डेक्कन पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी या हॉटेलातून एका २७  वर्षीय  उजबेकिस्थानी महिलेची सुटका केली असून याप्रकरणी राजेश आणि सुरज नावाच्या दोन आरोपींन विरोधात डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.१३) रॅमी ग्रँड या पंचतारांकित हॉटेलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मनिषा झेंडे यांना मिळाली होती. त्यावरून सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सामाजिक सुरक्षा विभागातील अधिकारी आणि डेक्कन पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत त्या ठिकाणी धाड टाकून एका २७  वर्षीय  उजबेकिस्थानी महिलेची सुटका केली. याप्रकरणी राजेश आणि सुरज या दोघांविरोधात डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त शिरीष देशपांडे, सहाय्यक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे आणि त्यांच्या पथकाने केली.