पुण्यातील ‘या’ ठिकाणांना झपाटलेली (Haunted) ठिकाणं म्हंटल जात…

72

महाराष्ट्रामधील पुणे शहर हे विद्येचे माहेरघर शिवाय ऐतिहासिक स्थळ म्हणून ओळखले जाते. पुणे हे वेगवेगळ्या कलांनी, संस्कृतींनी परिपूर्ण आहे. असं म्हंटल जात कि, ‘पुणे तिथे काय उणे’. कला, संस्कृती, त्यासोबतच आश्चर्यचकित आणि पछाडलेल्या ठिकाणांसाठी सुद्धा पुणं ओळखलं जात. पुणे शहर जरी वेगाने विकसित होत असले तरी या पुण्यातील काही भीतीदायक गोष्टी अजूनही माहित नाहीयेत…

१. शनिवारवाडा किल्लापुण्यातील एक इतिहासकालीन वास्तू म्हणून ओळखला जाणारा ‘शनिवारवाडा’ किल्ला सर्वांचे लक्ष वेधून घेतो. असं म्हणतात कि, पौर्णिमेला या वाड्याच्या आसपास कोणी फिरकत सुद्धा नाही. यामागचे कारण असे आहे कि, ‘तरुण राजपुत्र असलेल्या नारायणराव पेशव्याच्या येथे खून करण्यात आला होता आणि त्यांचा मृतदेह नदीत लहान तुकडे करून फेकून देण्यात आला होता. या हत्येनंतर पेशवे प्रशासनाचे मोठे नुकसान झाले.’ त्यामुळे लोकांचा असा समज आहे की, अमावास्येच्या रात्री या वाड्यातून मदतीसाठी आरोळी ऐकू येते, रडण्याचे आवाज रात्री किल्ल्यातच ऐकू येतात. नारायणराव पेशवे यांचा आत्मा आजही इथे आहे असं म्हंटल जात.

२. सिंहगड किल्लापुण्यापासून अवघ्या 30 कि.मी. अंतरावर असलेला सिंहगड हा एक प्राचीन किल्ला आहे. जो एका उंच शिखरावर आहे आणि एक ऐतिहासिक ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे, परंतु बर्‍याच विचित्र घटना देखील या जागेबाबत नोंदवल्या गेल्या आहेत. असं म्हणतात कि, युद्धात धारातीर्थी पडलेल्या मराठा योद्धांचा आत्मा किल्ल्यात आजही भटकत आहे. या जागेबाबत आजही असा एक समाज आहे कि, मुलांनी भरलेली एक स्कूल बस गडाजवळील डोंगरावरून खाली पडली होती. आता ती मुलांच्या भुतांनी भरलेली बस येथे दिसते. शिवाय कधी कधी पांढरी कपडे घातलेली एक व्यक्ती तिथे विशिष्ट ठिकाणी दगडावर उभी रहाते आणि लोकांना घाबरवण्यासाठी तेथून खाली उडी मारते. म्हणूनच हा किल्ला आकर्षक जरी असला तरी पर्यटक सूर्य मावळण्यापूर्वी किल्ला सोडून पूर्तता असतात. 

३. व्हिक्टरी थिएटरव्हिक्टरी थिएटर हा देखील पुण्यातील एका भीतीदायक जागेपैकी एक आहे. व्हिक्टरी थिएटरची स्थापना 50 वर्षांपूर्वी केली गेली होती आणि तेव्हापासून आजूबाजूला भयंकर कथांना सुरुवात झाली असून नाट्यगृहाच्या कर्मचार्‍यांपासून रात्रीच्या वेळी थिएटरच्या बाहेर सभोवतालच्या लोकांना विचित्र आवाज ऐकू येतात. मोठमोठ्याने ओरडतात. तपास आणि पोलिसांच्या चौकशीनंतर रात्री थिएटरमध्ये काही असामान्य असे काहीही आढळले नाही. थिएटरच्या बदनामीमुळे संध्याकाळी तेथील रस्त्यावरील रहदारीसुद्धा कमी प्रमाणात दिसून येते.

४. पुणे कॅन्टोन्मेंटपुणे कॅन्टोन्मेंटला पुणे कॅम्प म्हणूनही ओळखले जाते. हा पुणे परिसरातील सर्वात वाईट भागांपैकी ‘पुणे कॅन्टोन्मेंट’एक आहे. असे मानले जाते की, युद्धात मरण पावलेल्या सैनिकांच्या भुतांचा आजही इथे वावर आहे. या क्षेत्राबद्दल बर्‍याच कथा आहेत ज्यामध्ये चित्र-विचित्र आवाज, किंचाळ्या आणि लोकांची विचित्र आकृती दिसते. या परिसरातील एक उध्वस्त आणि बंद घर या सर्व घटनांचे केंद्रस्थान मानले जाते. ज्यांनी या घरात जाण्याचा प्रयत्न केला ते काही मिनिटातच बाहेर आले. त्यांनी एका रहस्यमय अनुभवाबद्दल आणि आतमध्ये गुदमरल्या जाणार्‍या भावनाविषयी सांगितले ज्यामुळे तो जास्त वेळ आत राहू शकले नाहीत. जे लोक भुतांचा पाठलाग करतात, भुतांचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी हे सर्वोत्तम स्थान आहे.

५. चंदन नगरपुण्याच्या चंदन नगरमध्ये राहणारे संध्याकाळनंतर घराबाहेर पाऊल टाकायला सुद्धा घाबरतात. कारण तेथील लोकांचं म्हणणं आहे कि, रात्री दहाच्या नंतर मुलीचे भूत तेथे पाहायला मिळते. ती मुलगी तिच्या एका बाहुलीला घेऊन चालताना त्या लोकांनी पहिली आहे. लोक म्हणतात कि, त्या मुलीचा 10 वर्षांपूर्वी एका घरात मृत्यू झाला. तेव्हापासून ती आजूबाजूच्या लोकांना त्रास देत आहे. या भागातील लोकांमध्ये असलेल्या भीतीचा अंदाज आपण लावू शकतो कारण संध्याकाळच्या सुरूवातीपासूनच रस्ते सामसूम होतात. जेव्हा कि, मुलीचे भूत पाहिल्याची घटना बहुतेक मध्यरात्री नंतर घडली आहे.

WhatsAppShare