पुण्यातील भाजप नगरसेवकाची राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड विरोधात पोलिसात तक्रार

124

पुणे, दि. २० (पीसीबी) –  अंनिसचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने औरंगाबाद येथून सचिन अंदुरे याला अटक केली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून ‘तीन वर्षापूर्वी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात माझ्यावर जो प्राणघातक हल्ला झाला तेव्हा अंदूरे हा धीरज घाटे बरोबर तिथे उपस्थित होता’असे सांगितले आहे.