पुण्यातील बुधवार पेठेत दहीहंडीच्या कार्यक्रमाचा स्टेज कोसळून १५ जण जखमी

247

पुणे, दि. ४ (पीसीबी) – दहीहंडीचा कार्यक्रम सुरु असतानाच बुधवार पेठेतील शिवाजी तरुण मंडळाचा स्टेज कोसळून १५ जण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि.३) रात्रीच्या सुमारास बुधवार पेठेतील डिस्को बिल्डींगच्या शेजारील शिवाजी तरुण मंडळ येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी बुधवार पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या स्टेजवर दहीहंडीचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुरु असतानाच स्टेज कोसळला. या घटनेमध्ये स्टेजवरील मंडळाचे १४ ते १५ कार्यकर्ते खाली पडून जखमी झाले.  त्यापैकी ४ ते ५ जण गंभीर जखमी आहेत. दरम्यान क्षमतेपेक्षा जास्त लोक स्टेजवर आल्याने हा स्टेज कोसळला असल्याचे बोलले जात आहे. स्टेज कोसळा तेव्हा गोविंदा पथकाला बक्षीसाची ट्रॉफी आणि रक्कम दिली जात होती, नेमक त्याचवेळी हा स्टेज कोसळल्याने, गोविंदा पथकही जखमी झाले आहे.