पुण्यातील ज्येष्ठ क्रीडा पत्रकार प्रल्हाद सावंत यांचे निधन

161

पुणे, दि. १० (पीसीबी) –  ज्येष्ठ क्रीडा पत्रकार प्रल्हाद सावंत यांचे गुरुवारी (दि.९) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. प्रल्हाद सावंत हे प्रभावी क्रीडा संघटक आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे संस्थापक सदस्य होते.

पत्रकारनगर येथील राहत्या घरी प्रल्हाद सावंत यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे अॅथलेटिक्ससह क्रीडाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.