पुण्यातील जनता वसाहतमध्ये निलेश वाडकर आणि चॉकलेट सुन्या गटात जबर हाणामारी; एकाचा मृत्यू

0
7022

पुणे, दि. १४ (पीसीबी) – शहरातील जनता वसाहतमध्ये दोन गटात पूर्ववैमनस्यातून तुफान हाणामारी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या घटनेत एका सराईत गुन्हेगाराचा मृत्यू झाला आहे.

निलेश वाडकर असे मृत्यू झालेल्या सराईताचे नाव आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास पुण्यातील जनता वसाहतमध्ये धारदार हत्यारांनी दोन गटात जबर हाणामारी झाली. यामध्ये चार जणांवर वार झाले आहेत. यातील गणेश यादव, अमोल कदम, सुजित वदंबे हे तिघे गंभीर जखमी आहेत. तर सराईत निलेश हा जागीच ठार झाला. जखमींमवर सध्या रूग्णालयात उपचार सुरु आहेत. तर योगेश जांभळे आणि अभिजित कडू या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर अन्य १० ते १२ जण पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. दत्तवाडी पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, निलेश वाडकर आणि चॉकलेट सुन्या या दोन गटातील वर्चस्वाच्या लढाईतून  निलेशचा खून झाल्याचे बोलले जात आहे.