पुण्यातील चांदणी चौकात मराठा आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक

350

पुणे, दि. ९ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज (गुरुवार) पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ दरम्यान पुण्यातील चांदणी चौकात बंदला हिंसक वळण लागले.

मराठा क्रांती मोर्चाच्यातील काही संतप्त आंदोलकांनी अचानक पोलिसांवर दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज केला आहे. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केल्याने पोलिसांना हा लाठीचार्ज करावा लागला. दगडफेक का करण्यात आली हे अद्याप समजू शकले नाही. दरम्यान पुण्यातील लक्ष्मी रोड येथे देखील एका पीएमपी बसची तोडफोड करण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाची देखील तोडफोड झाली आहे. तर पुणे-मुंबई हायवे आणि पुणे-नाशिक हायवे आंदोलकांनी बंद पाडला आहे.