पुण्यातील गोयल गंगा कंपनीला १०० कोटींचा दंड

1080

पुणे, दि. ११ (पीसीबी) – पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी  गंगा भाग्योदय प्रकल्प राबवणाऱ्या पुण्यातील गोयल गंगा कंपनीने १०० कोटी रुपये किंवा प्रकल्पाची एकूण किंमत यापैकी जी जास्त असेल, ती दंड स्वरुपात भरण्यात यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने  आज (शनिवार) दिला आहे.  

गोयल गंगा कंपनीच्या पुण्यातील सिंहगड रोडवरच्या गंगा भाग्योदय या प्रकल्पासंबंधित हा निर्णय  सर्वोच्च न्यायालयाने  दिला आहे. पर्यावरणाच्या नियमांची उल्लंघन केल्याप्रकरणी या कंपनीला १००  कोटी रुपये किंवा या प्रकल्पाची एकूण किंमत यापैकी जी रक्कम जास्त असेल ती दंड स्वरूप भरण्याचा आदेश दिला आहे.

दरम्यान या कंपनीच्या २  इमारतींच्या बांधकामांना न्यायालयाने  स्थगिती  दिली आहे. पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनीला हा मोठा धक्का  बसल्याचे  मानले  जात  आहे.