पुण्यातील एम्प्रेस गार्डन जवळील कॅनॉलमध्ये बुडालेल्या मुलाचा आखेर मृतदेह सापडला

70

पुण्यातील घोरपडी येथील कवाडे मळा जवळ असलेल्या एम्प्रेस गार्डन जवळील कॅनॉलमध्ये बुधवारी (दि.११) एक नऊ वर्षांचा मुलगा बुडाल्याचे वृत्त होतो.

सोमनाथ मोरे (वय ९, रा. येरवडा) असे कॅनॉलमध्ये बुडून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. त्याचा शोध अग्निशमनचे जवान काल बुधवार (दि.११) पासून करत होते. मात्र आज गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह अग्निशमनचे जवानांच्या अथक प्रयत्नानंतर सापडला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ आणि त्याचा भाऊ हे दोघे बुधवारी त्यांच्या मित्रांसोबत इम्प्रेस गार्डनमध्ये फिरायला गेले होते. दरम्यान हे सर्व जण येथील् कॅनॉलमध्ये पोहायला उतरले. त्यावेळी वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने सोमनाथ हा पाण्यामध्ये बुडाला, सोमनाथ पाण्यामध्ये बुडताच त्याच्या मित्रांनी आणि भावाने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. मात्र सोमनाथ तोपर्यंत वाहून गेला होता. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करुन सोमनाथचा शोध सुरू केला, मात्र बुधवारी त्याला शोधण्यात यश आले नाही. बुधवारच्या अपयशानंतर आज पुन्हा सोमनाथचे शोधकार्य सुरू करण्यात आले, त्यावेळी सोमनाथचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी आढळून आला.  त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून शवविच्छेदन झाल्यानंतर सोमनाथचा  मृतदेह हा कुटूंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.