पुण्यातील उबर टॅक्सीचालकाची हत्या करुन टॅक्सी लातूरमध्ये नेऊन विकणाऱ्या दोघांना अटक

1180

लातूर, दि. ३० (पीसीबी) – कर्ज फेडण्यासाठी पुण्यात उबर टॅक्सीचालकाची हत्या करुन टॅक्सी लातूरमध्ये नेऊन विकण्याच्या तयारीत असलेल्या दोघा आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

विजय देवराव कापसे असे हत्या झालेल्या टॅक्सी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी मज्जू अमीन शेख आणि समीर शेख या दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातून विजय कापसे या चालकाची उबर टॅक्सी भाडयाने घेऊन मज्जू अमीन शेख आणि समीर शेख हे दोघे सासवडला गेले.  तेथे त्यांनी टॅक्सीचालक विजयची हत्या केलानंतर टॅक्सी घेऊन लातूरला गेले. तिथे ही चोरीची टॅक्सी विकण्याचा प्रयत्न त्यांनी सुरु केला. लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेला याची माहिती मिळताच त्यांनी माग काढला चौकशीसाठी दोघा तरुणांना ताब्यात घेतले. अखेर दोघांनीही हत्या केल्याची कबुली दिली. लातूर पोलिसांनी पुणे पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यावर स्थानिक पोलिस घटनास्थळी गेले. तिथे विजयचा मृतदेह आढळला. कर्ज फेडून झटपट पैसे कमवण्यासाठी आपण हा मार्ग निवडल्याचे आरोपींनी सांगितले. सासवड पोलिसांनी टॅक्सी ताब्यात घेऊन आरोपींची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे.