पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयातील विद्यार्थी मार्गदर्शक कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

111

पुणे,  दि. २७ (पीसीबी) – भारतीय कला प्रसारणी सभेकडून चालविल्या जाणाऱ्या अभिनव कला महाविद्यालय टिळक रोड आणि पाषाणच्या विद्यार्थ्यांकरिता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित केलेली एक दिवसीय कार्यशाळा पार पडली. विशेष म्हणजे या कार्यशाळेस नवी दिल्ली येथील  नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचे अध्यक्ष शाम शर्मा, नामवंत लेखक व कलाकार  सुभाष पवार व  प्रसिद्ध चित्रकार प्राचार्य विलास चोरमले सहभागी झाले होते.

दरम्यान, यावेळी प्रसारणी सभेचे दिवंगत सचिव भालचंद्र पाठक, भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि जेष्ठ क्रिकेटपटु अजित वाडेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी पुष्कराज पाठक बोलताना म्हणाले, आत्ताच्या स्पर्धेच्या आणि जाहिरातीच्या युगात व्यावहारिक ज्ञानाला फार महत्त्व आहे. अशा वेळी कला क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळावे या उद्देशाने आम्ही कार्यशाळेचे आयोजन केले. गरीब विद्यार्थ्यांचे हीत लक्षात घेऊन ही कार्यशाळा निःशुल्क ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला. आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी खरोखरच गुणवंत आहेत. शासनाच्या अनेक उपक्रमांमधील चित्रे आमच्या विद्यार्थ्यांकडून काढून घेतली जातात, याचा आम्हाला आभिमान आहे. अभिनव कला महाविद्यालयास देशातील कलेचे सर्वोत्तम विद्यापीठ करण्याचे ध्येय आमच्या संस्थेचे आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी प्रसारण सभेचे अध्यक्ष जयदीप लडकत, कायदेतज्ञ गिरीश शिंदे, वास्तू विशारद, ए.एम.पाठक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र खरे आणि रोहिणी गोरे यांनी केले होते.