पुण्यातील अतिक्रमण हटवताना वृध्देला पोलिसांकडून मारहाण

390

पुणे, दि. ११ (पीसीबी) – अतिक्रमण हटवताना पोलीस आणि रस्त्यावरील दुकानदारांमध्ये वाद झाला. यादरम्यान पोलिसांनी एका वृद्ध महिलेला मारहाण केली. ही घटना हडपसर परिसरातील रेल्वे ब्रिज ते भीमनगर रस्त्यावर घडली. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरातील रेल्वे ब्रिज ते भीमनगर रस्त्यावर विक्रेत्यांनी अनधिकृतपणे आपली दुकाने मांडली होती. या अनधिकृतपणे बसलेल्या विक्रेत्यांवर अतिक्रमण विभाग आणि पोलीस कारवाई करत होते. कारवाई दरम्यान अनेक अनधिकृत विक्रेत्यांना पोलिसांनी भर रस्त्यात, गर्दीसमोर मारहाण केली. तसेच भीमनगर परिसरात चहा विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या वृद्ध महिलेलाही पोलिसांनी मारहाण केली. पोलिसांद्वारे केलेल्या या अमानूष वागणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.