पुण्याच्या दिशेने निघालेल्या ‘शिवशाही’ बसला रायगडमध्ये अपघात; ३१ प्रवासी जखमी

106

पुणे, दि. २५ (पीसीबी) – दापोलीवरुन पुण्याच्या दिशेने निघालेल्या राज्य परिवहन मंडळाच्या शिवशाही बसला रायगड जिल्ह्यातील लोणेरेजवळ अपघात झाला. या अपघातात ३१ प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमी प्रवाशांवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.