पुणे शहर पोलिस दलातील एक सहायक आयुक्त, २६ पोलीस निरीक्षक पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात वर्ग

524

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे प्रशासकीय कामकाज स्वातंत्र्यदिन (दि.१५ ऑगस्ट) पासून सुरु करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिस दलातील सत्तावीस पोलीस अधिकाऱ्यांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात वर्ग करण्यात आले आहे. यामध्ये एक सहायक आयुक्त आणि २६ पोलीस निरीक्षकाचा समावेश आहे.

पुणे पोलीस आयुक्त व्यंकटेशम यांनी मंगळवारी सायंकाळी काढलेल्या आदेशामध्ये सहायक पोलिस आयुक्त सतीश पाटील, पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, रवींद्र चौधर, मोहनराव शिंदे, प्रसाद गोकुळे, शिवाजी गवारे, सतीश माने, सुनील पिंजण, विठ्ठल कुबडे, रंगनाथ उंडे, रवींद्र जाधव, प्रभाकर महिपती शिंदे, विश्वजीत खुळे, नरेंद्र जाधव, अजय भोसले, भिमराव शिंगाडे, खंडेराव खेरे, राजेंद्र काळे, शंकर अवताडे, नवनाथ घोगरे, नितीन विजय जाधव, अरुण ओंबसे, संजीव पाटील, किशोर म्हसवडे, रवींद्र निंबाळकर, ब्रम्हांनन्द नाईकवडी, अरविंद जोंधळे या सर्व अधिकाऱ्यांना  पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात वर्ग करण्यात आले आहे.