पुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार; एक जण जखमी

835

पुणे, दि. १८ (पीसीबी) – पुणे विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज (शनिवारी) सकाळी अकराच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत एक जण जखमी झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे विद्यापीठ चौकात आज (शनिवारी) सकाळी अकराच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या टोळक्यांनी गोळीबार केला. गोळीबार करणारे सांगवीच्या दिशेने गेल्याची माहिती सुत्रांनी दिली. दरम्यान, या गोळीबारात एक जण जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान विद्यापीठ चौकात सकाळच्या सुमारास प्रचंड गर्दी असते. अशावेळी गोळीबाराची घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

घटनेचे माहितीमिळताच चतुःश्रुंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, गोळीबाराचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. विद्यापीठ चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे पोलिस तपासत आहेत. पोलिस तपास करत आहेत.