पुणे रेल्वे स्टेशनवर बॉम्ब सदृश्य वस्तू

144

पुणे, दि. १३ (पीसीबी) – पुणे रेल्वे स्टेशन वर आज्ञात व्यक्तीने ठेवला बॉम्ब सदृश्य वस्तू सापडली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वर वाहतूक थांबवण्यात आली आहे.दोन्ही फलाटं रिकामी करण्यात आली आहेत.

घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक असून सर्व नागरिकांना परिसरापासून लांब पाठवण्यात आलं आहे. तसेच पुण्याकडे येणाऱ्या सर्व ट्रेन थांबवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय पुणे स्टेशनच्या परिसरातील वर्दळ कमी करण्यात आली असून नागरिकांना स्टेशनपासून लांब करण्यात आलंय. प्रवाशांना स्टेशन परिसरातून बाहेर काढण्यात आले आहे. पुणे स्टेशन वर मोठा पोलीस बंदोबस्त. पोलिसांकडून रेल्वे स्टेशन परिसराची पाहणी.