पुणे येथे २९ फेब्रुवारी रोजी मराठा समाजातील विवाहेच्छुकांसाठी वधू वर मेळाव्याचे आयोजन

155
पिंपरी, दि.२८ (पीसीबी) – पुणे शिवश्री प्रतिष्ठान सोलापूर व महाराष्ट्र वधु वर सुचक केंद्र ( पुणे )यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.२९ फेब्रुवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन,पुणे स्टेशन माल धक्क्या समोर, पुणे रेल्वे स्टेशन जवळ या ठिकाणी सकाळी ११ वाजता वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आले आहे.

 

आत्तापर्यंत जगभरातून या वेबसाइटवर १०,००० वधू वरांनी आपली नावे नोंदवलेली आहेत. त्यातून जवळपास २२५० वधू वरांची लग्ने जमलेली आहेत. आज पर्यंत विवाह संस्थेने एकत्रित असे १५०० वधू वर मेळावे आयोजित केले आहेत. असे या पुणे शिवश्री प्रतिष्ठान सोलापूर व महाराष्ट्र वधु वर सुचक केंद्र( पुणे) संस्थेकडून सांगण्यात येत आहे. शनिवार दि.२९ फेब्रुवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन,पुणे स्टेशन माल धक्क्या समोर, पुणे रेल्वे स्टेशन जवळ या ठिकाणी होणाऱ्या वधू वर मेळाव्यात संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील तसेच मराठावाड्यातील मराठा समाजातील राजपत्रीत अधिकारी डॉक्टर, इंजिनियर, कॉम्प्युटर इंजिनियर, व्यापारी व राजकारणीतील ८ हजार वधू वरांची माहिती सदरील कार्यक्रमात पालकांना व वधू वरांना दाखविली जाणार असल्याची माहिती  कार्यध्यक्ष शिवश्री प्रतिष्ठान  रंजना घोलप यांनी दिली. या मेळाव्यात संपूर्ण जिल्ह्यातील वधूवरांच्या पालकांनी मोठ्या प्रमाणात (www.marathajodidar.com) वेबसाईटवर आपल्या वधू वरांची नावे नोंदवावीत असे आवाहन या पुणे शिवश्री प्रतिष्ठान सोलापूर व महाराष्ट्र वधु वर सुचक केंद्रांकडून करण्यात आले.