पुणे म्हाडाच्या संचालकपदी राहुल कलाटे, शैलेंद्र मोरे आणि स्वाती ढमाले यांची निवड

88

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांची पुणे म्हाडाच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचे कार्यकर्ते शैलेंद्र मोरे आणि स्वाती ढमाले यांची पुणे म्हाडाच्या सदस्यपदी निवड झाली आहे.

भाजप-शिवसेना युती सरकारने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्याच्या विविध महामंडळांवर कार्यकर्त्यांची वर्णी लावली आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांची पुणे म्हाडाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे शिवसेनेचे कार्यकर्ते शैलेंद्र मोरे आणि स्वाती ढमाले यांचीही पुणे म्हाडाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.