पुणे-मुंबई शिवनेरी बसला अपघात; पाच प्रवासी जखमी

256

पुणे, दि. २२ (पीसीबी) – पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका शिवनेरी बसला अपघात झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.२१) रात्री पावनेबाराच्या सुमारास सायन-पनवेल महामार्गावर झाला. या अपघातात पाच प्रवासी  जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पुणे-मुंबई शिवनेरी बस पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघाली होती. रात्री पावनेबाराच्या सुमारास सानपाडा रेल्वे स्थानकासमोर एका दुचाकीस्वाराला वाचवताना बस दुभाजकावर आदळून उलटली. या बसमध्ये एकूण २० प्रवासी होते. त्यापैकी पाच प्रवाशांना किरकोळ मार लागला. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून शिवशाही बसच्या  अपघात  वाढ झाली आहे. त्यात आता शिवनेरी बसला अपघात झाल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण  आहे.