पुणे-मुंबई महामार्गावरील कार्ला फाट्याजवळ दोन कारमध्ये भीषण अपघातात; सात जणांचा जागीच मृत्यू

204

लोणावळा, दि. १५ (पीसीबी) – पुणे-मुंबई महामार्गावरील कार्ला फाट्याजवळ दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज (रविवार) दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील कार्ला फाट्याजवळ मुंबईच्या दिशेने जाणारी स्वीफ्ट  आणि पुण्याच्या दिशेने येणारी सॅन्ट्रो या दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात स्वीफ्टमधील ५ प्रवासी आणि सॅन्ट्रोमधील दोघे असे एकूण ७ सात जण जागीच ठार झाले आहेत. अपघामुळे पुणे-मुंबई महामार्गावरील दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी  झाली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदत कार्य सुरु आहे.