पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक आज दुपारी २ तासांसाठी बंद  

114

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर  आज (गुरूवार) दुपारी १२ ते २ या वेळेत मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्याकडून द्रुतगती मार्गावरील मुंबई लेन की.मी. ६५.५०० या ठिकाणी ओव्हरहेड गॅट्री बसविण्याचे काम करण्यात येणार आहे, अशी माहिती महामार्ग सुरक्षा पथक पुणे प्रादेशिक विभाग यांच्यावतीने देण्यात आली आहे. चारचाकी वाहनचालकांनी व इतर प्रवाशांनी किवळे ब्रिज येथून जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने मुंबईकडे जाऊ शकतात.

आज दुपारी १२ ते २ च्या सुमारास मुंबई-पुणे लेनवरील किलोमीटर क्रमांक ६५.५०० येथील ठिकाणी ओव्हरहेड गॅट्री बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तासांकरिता पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्यादरम्यान, सर्व प्रकारच्या अवजड व मालवाहतूक करणारी वाहने द्रुतगती मार्गावरील किलोमीटर क्रमांक ६६ या ठिकाणी थांबविण्यात येणार आहे. याची नोंद प्रवाशांनी घ्यावी.

तसेच हलकी चारचाकी वाहन व इतर प्रवाशी वाहन द्रुतगती मार्ग किवळे ब्रिज येथून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वळविण्यात येणार आहेत. याची नोंद मुंबई च्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी घ्यावी. तरी दुपारी १२ ते २ या वेळेत प्रवाशांनी महामार्ग पोलिसांना सहकार्य करावे,  असे आवाहन महामार्ग सुरक्षा पथक पुणे प्रादेशिक विभाग यांच्याकडून करण्यात आले आहे.