पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर दुचाकीचा भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी

39

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर दुचाकीला बंदी असूनही मुंबईच्या दिशेने निघालेल्या एका दुचाकीवरील दोघांचा दुचाकी घसरल्याने भीषण अपघात झाला आहे. हा अपघात रविवारी (दि.८) रात्री दहाच्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर कामशेत बोगद्याजवळ झाला.

दिलीप आणि शेखर अशी अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत.

महामार्ग पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप आणि शेखर रविवारी (दि.८) रात्री दहाच्या सुमारास  (एम एच/ ०३/ बी के/ ७३३४) या  त्यांच्या दुचाकीवरून पुण्याकडून मुंबईच्या दिशेने  जात होते. दुचाकी वाहनांना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाव बंदी असून ही त्यांनी वेळ वाचविण्यासाठी द्रुतगती मार्गाने मुंबईकडे जाण्यास निघाले होते. यावेळी वेगाने जात असताना कामशेत बोगद्याजवळ दुचाकी अचानक घसरली. त्यामुळे दोघेही रस्त्यावर पडले व गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. दरम्यान, इतर काही सतर्क प्रवाशांनी बीव्हीजीच्या रुग्णवाहिकेला फोन केला. दोघांनाही जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.