पुणे महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणाची चार लाखांची फसवणूक

104

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पुणे महापालिकेत बिगारी म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची तब्बल चार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही फसवणूक २०१४ ते आजपर्यंत शुक्रवार पेठेत करण्यात आली.

अवधुत टाक (वय २९, रा. शुक्रवार पेठ, पुणे) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने साईनाथ यशवंत थोरात (वय ३५, रा. अंबिला ओढा, कॉलनी) आणि इतर एका विरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अवधुत टाक या तरुणाला आरोपी साईनाथ थोरात आणि त्याच्या आणखी एका साथीदाराने पुणे महापालिकेत बिगारी म्हणून कामाला लावतो असे सांगून त्याच्या कडून २०१४ साली तब्बल चार लाख रुपये उकळले. मात्र आरोपींनी अवधुत याला कामाला न लावता त्याची चार लाख रुपयांची आर्थीक फसवणूक केली, अशी तक्रार अवधुत याने पिंपरी पोलिसांकडे केली आहे. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.