पुणे महापालिकेच्या महापौरपदी मुरलीधर मोहोळ यांची निवड

287

पुणे,दि.२२(पीसीबी) –  पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांची निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी सरस्वती शेंडगे यांची निवड झाली आहे. मोहोळ यांनी प्रकाश कदम यांचा 38 मतांनी पराभव केला. निवडणुकीमध्ये शिवसेनेने राष्ट्रवादी, कॉग्रेस आघाडीला मतदान केले , मात्र तरीही त्यांचा उमेदवार निवडून येऊ शकला नाही. तर उपमहापौरपदी सरस्वती शेडगे यांची निवड करण्यात आली आहे. 

तर यावेळी मावळत्या महापौर मुक्ता टिळक आणि उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांचा विशेष सत्कार केला.

WhatsAppShare