पुणे महापालिकेच्या आयुक्तांची बदली

151

पुणे, दि.२२ (पीसीबी) – राज्यातील १६ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यात कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांचे नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. 

राव यांच्यासह पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांच्या जागी आयुष प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमध्ये पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. सौरभ राव यापुढे राज्याचे साखर आयुक्त म्हणून काम पाहतील. सौरभ राव यांच्या जागी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सौरभ राव यांनी सुरुवातीला पुण्याचे जिल्हाधिकारी, त्यानंतर महापालिका आयुक्त आणि आता साखर आयुक्त म्हणून ते पुण्यातच कार्यरत राहणार आहेत.

 

WhatsAppShare