पुणे महानगरपालिकेसह हवेली भूमिलेख अधिकाऱ्यांच्या मदतीने बळकावली जागा आणि….

108

पुणे, दि.१२ (पीसीबी) : पुणे महानगरपालिका आणि हवेली भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून जागा बळकावत फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीसांनी रोहीत धनश्याम गुप्ता, मुकेश धनश्याम गुप्ता, किशोर गाडा, निलेश गाडा तसेच पुणे महापालिकेच्या आणि भूमी अभिलेखमधील अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवला आहे.

विश्रांतवाडी पोलीसांत विशाल खंडागळे (वय ३५) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादींची धानोरीत जागा आहे. सर्व्हे नं. २९ मध्ये एकूण १५ हजार १०० स्केवर मिटर जागा आहे. २००९ ते २०२१ या काळात मंत्रा २९ गोल्ड कोस्ट डेव्हलपर्स एलएलपीचे भागीदार आरोपींनी त्यांच्या वहिवाटीची जागेपैकी फ्लॅट क्रमांक १६, २० व २१ क्षेत्र ९ आर (गुंठे ) या जागेची भूमी अभिलेख कार्यालयात खोटी माहिती देऊन मोजणी केली. परंतु, या जागेचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. हा दावा प्रलंबित असून तरीही पुणे महानगरपालिकेच्या व हवेली भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी संगणमत करून मंत्रा २९ गोल्ड कास्ट या स्कीमचा प्लॅन पास केला. तसेच, फिर्यादी यांची ही जागा त्यांची असल्याचे भासवून बळकावून फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे.

WhatsAppShare