पुणे पोलिस आयुक्तपदी डॉ. के. व्यंकटेशम तर अतिरिक्त महासंचालक भूषणकुमार हे नागपूरचे नवीन पोलिस आयुक्त

126

पुणे, दि. ३० (पीसीबी) – पुणे शहराच्या पोलिस आयुक्तपदी डॉ. के. व्यंकटेशम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापूर्वी नागपूर शहर पोलिस आयुक्त म्हणून काम पाहत होते. तर पुणे शहराच्या सध्याच्या  पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची अप्पर पोलिस महासंचालक (वाहतूक) पोलिस महासंचालक कार्यालय मुंबई येथे बदली करण्यात आली आहे.

तसेच अतिरिक्त महासंचालक (कारागृह) भूषणकुमार उपाध्याय हे नागपूरचे नवीन पोलिस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारणार आहे.