पुणे पोलिसांचा धक्कादायक दावा; सुधीर ढवळेंसह अटक करण्यात आलेल्या पाचही जणांचा नक्षलवाद्यांशी संबंध

53

पुणे, दि. ७ (पीसीबी) – पुण्यातील शनिवारवाडा येथे आयोजीत करण्यात आलेल्या एल्गार परिषदेमध्ये नक्षलवाद्यांचा हात आणि पैसा होता, अशी धक्कादायक माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. इतकेच नाही तर बुधवार (दि.६) अटक करण्यात आलेल्या सुधीर ढवळेंसह, सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, शोमा सेन आणि रोना विल्सन यांचा प्रतिबंधीत नक्षलवादी संघटनांशी संबध आहे, त्याचे पुरावे आहेत, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मात्र भीमा कोरेगाव हिंसाचारात या पाच जणांचा सहभाग होता का, हे अजून सिद्ध झालेले नाही, त्याचा तपास सध्या सुरु आहे, अशी माहिती पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान एल्गार परिषदेच्या आयोजनामधे अनेक संघटनांचा सहभाग होता. याचा अर्थ सर्वांचा माओवाद्यांशी संबंध आहे असे नाही, असे देखील स्पष्टीकरण पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी यावेळी दिले.